आपल्यामधल्या अर्जुनाला आपल्यामधलाच श्रीकृष्ण ज्यावेळी सांभाळेल त्यावेळी गीता खरी उमगेल. कृष्ण आणि अर्जुन हे माझ्या जीवनाच्या एकाच रंगमंचावर समजले म्हणजे गीता उमजली! आणि त्यासाठी श्रीकृष्णार्जुनसंवादे मधील संवाद समजावून घ्यायला हवा.
श्रीभगवद्गीता मला समजली नाही असं आपण म्हणूच शकत नाही. आपण तर प्रत्यक्ष अनुभवतो. अहो अर्जुनाचा सगळा रोल आपणच तर करतो की आपल्या आयुष्यामध्ये. आणि जेंव्हा आपण सोडून दुसरं कुणीतरी अर्जुन होऊन आपल्याकडे मदत मागतं तेंव्हा आपण श्रीकृष्णच असल्यासारखे सल्ले देतोच की. म्हणजे श्रीकृष्णाचा रोल सुद्धा आपल्याला समजतोच की! म्हणजे एका रंगमंचावर अर्जुन समजतो तर दुसऱ्या रंगमंचावर कृष्ण समजतो! त्यामुळे प्रश्न भगवद्गीता समजण्याचा नाहीये तर ती उमजण्याचा आहे. आपल्यामधल्या अर्जुनाला आपल्यामधलाच श्रीकृष्ण ज्यावेळी सांभाळेल त्यावेळी गीता खरी उमगेल. कृष्ण आणि अर्जुन हे माझ्या जीवनाच्या एकाच रंगमंचावर समजले म्हणजे गीता उमजली! आणि त्यासाठी श्रीकृष्णार्जुनसंवादे मधील संवाद समजावून घ्यायला हवा.
भाग ०१: अर्जुनाचा रुबाब
भाग ०२: कृष्णाची एंट्री
भाग ०३ – खऱ्या यज्ञाची कृष्णाकिल्ली
भाग ०४: नट नाटकाचा उलगडा
भाग ०५: अबब … काय हे प्रश्न?
भाग ०६: उडला पदर, कळला वारा
भाग ०७: खेळ, अमृत, आनंद
भाग ०८: झुळूक आणि अत्तर
भाग ०९: कृष्णाच्या नकला – अर्जुनाचा यॉर्कर
भाग १०: पुन्हा पाच, एक जबरदस्त सूत्र!
₹5,900.00
₹9,600.00
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
12 reviews for गोष्ट भगवद्गीतेची – एका सुसंवादाची
उमेश शिंदे –
सर्वात प्रथम हार्दिक धन्यवाद, ज्योत पेटवल्याबद्दल, हा मित्र संवादाचा दृष्टिकोन इतका सहज होता कि बाण उरी लागलाच. पण पुन्हा हि ज्योत
किंवा माझा अर्जुन जागृत ठेवण्याचे कर्म माझ्या अंगणात आले व उचलल्या विना राहावलेच नाही सो कायम बरोबर राहा मार्गदर्शकाच्या रोल मध्ये हि विनंती
Karuna Nair –
आपल्यातील अर्जुन आणि कृष्णाला दृश्य स्वरूपात दाखवून गीतासार आणि अथर्वशीर्ष यथार्थपणे आमच्या पर्यंत पोचवणारा एक उत्कृष्ट गुरू आणि वाटाड्या
Bhalchandra Sali –
उत्तमच सांगतात डीजी की ज्यामुळे गीतेबद्दलची गोडी तर वाढलीच पण त्याहीपेक्षा अधिक स्वतःलाच व स्वतःमधील क्षमतांची समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागतेय असं जाणवतं.
कोर्स चांगला डिझाईन केलेला आहे.
मंगलप्रभा कोरी –
DG च्या गीतेच्या विश्लेषणातून गीता मनात व्यवस्थित रुजली आहेच .गोष्ट भगवद्गगीतेची या पुस्तकाच्या वाचनातून त्याला खतपाणी देत रहायचे व पुढील आयुष्यात सकारात्मक बदल घडवूनआणण्याचे काम आमचे ! कोर्स संपला त्यावेळी कोर्स संपल्याच्या थोड्या अस्वस्थतेसह कधी नव्हे इतकी मनाची शांतता अनुभवली. आयुष्याच्या पुढच्या प्रवासात तीच योग्य दिशा दाखवेल .
स्मिता संदिप रासने –
DG, तुम्ही कमाल केलीत. गेली कित्येक वर्षे मी चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करत होते, तुम्ही उत्तम मार्ग दाखवला..श्रद्धा आणि क्षमता सोबतीला मिळाल्या..आता मजा येतेय, खूप शांत आणि आनंदी वाटतंय
अनुपा गुप्ते –
खुप सोप्या शब्दात डिजी सांगतात, त्यांची सांगण्याची पद्धत छान आहे, ऐकत राहावेसे वाटते.
Gauri Chandradhekhar Raste –
व्यवहारात, रोजच्या जीवनात, गीतेची तत्व वापरण्याची युक्ती, सोप्या व पटेल अशा शब्दात सांगितली. DG, तुमची, आनंद शोधून देण्याची तळमळ थेट पोचली. कोणताही अट्टाहास न करतां, अगदी सहज, इतके गूढ वाटणारे तत्त्वज्ञान, संवाद रूपाने प्रत्येक वाटसरुला आपलेसे वाटावे असे समजावून सांगितले
Manasi Subhash Jangam –
उत्तम सादरीकरण.. विषय सहज सोप्या भाषेत समजावला. खूप सुंदर कोर्स… वेगळा दृष्टिकोन मिळाला
Rita Apte –
विचारांना चालना आणि नवीन दिशा मिळाली. अवघड गोष्ट सोपी करून सांगण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. धन्यवाद
Suchita Dabir –
This was just what I needed.
I consider myself fortunate to have learned Geeta from a unique perspective that is applicable and useful in everyday life situations.
Vinay Dhande –
Got a completely new perspective of Geeta by DG. I never thought about looking at Geeta as a Natak. Ani a conversation between friend. I can see that DG has done great amount of work on these concept.
Mohan Patil –
Thank you DG for taking us through this wonderful journey of BhagvatGeeta. It is complete new prespective on BhagvatGeeta. You have very well related Krushn arjuna dialogues to our day to day life. Thanks