आपल्यामधल्या अर्जुनाला आपल्यामधलाच श्रीकृष्ण ज्यावेळी सांभाळेल त्यावेळी गीता खरी उमगेल. कृष्ण आणि अर्जुन हे माझ्या जीवनाच्या एकाच रंगमंचावर समजले म्हणजे गीता उमजली! आणि त्यासाठी श्रीकृष्णार्जुनसंवादे मधील संवाद समजावून घ्यायला हवा.
गीतेमधील संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो, तेव्हा खरं तर आपण आपल्याकडेच दुर्लक्ष करतो. अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत हे उमजत नाही आणि मग श्रीकृष्णाची उत्तरं सुद्धा आपली रहात नाहीत. जगावं कसं हे सांगणारं पुस्तक जगण्यापासून लांब जातं. या सगळ्यामुळे व्यासांचं, कृष्णाचं, किंवा अर्जुनाचं नाही तर आपलं नुकसान झालंय. बिगरी ते मॅट्रिक या कथनात पु.ल.म्हणतात की ‘मला कर्ता आला, कर्म आलं पण इंग्रजी आलं नाही’.
तसंच ‘मला सगळ्या अध्यायांची नावं पाठ झाली, श्लोक पाठ झाले, पण गीतेमधली गम्मत काही कळली नाही.’ असं नको ना व्हायला? तर मग कॉफीशॉपमध्ये चाललेल्या दोन मित्रांच्या हृद्य गप्पांसारखा हा संवाद अनुभवुया. प्रश्न विचारण्याची अर्जुनाची चिकाटी आणि उत्तरं देण्याची कृष्णाची हातोटी यांनी सजलेलं हे आनंददायी नाट्य आहे. घोकंपट्टीचं संवादात, गंभीरतेचं आनंदात, आणि दांभिक चर्चांचं प्रामाणिक प्रयत्नात रूपांतर करूया. त्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल.
पुस्तकातील अनेक चित्र यात चक्क इमेज गॅलेरीमध्ये जाऊन पाहता येणार आहेत. जिथे श्लोक आणि त्यांचे अर्थ यांचा वापर आहे त्यावेळी श्लोक, फोड आणि अर्थ दिसणार आहे. पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे.
₹6,100.00
₹4,650.00
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
10 reviews for गोष्ट भगवद्गीतेची – ऑडिओव्हिडिओ बुक
Nimish Sutar –
अतिशय सुंदर आणि सुरेख पद्धतीने आपण bhagawat गीता समजवली.Simplicity at the core
Swati Kadu –
Many things to appreciate. Right from the perspective of understanding Bhagavadgita. Coming up with such a different and unique perspective of Bhagavadgita especially in a society where Bhagavadgita has been worshipped as a religious text or scripture without understanding the real meaning of it is really courageous and commendable!
Manali Vadgaonkar –
Connect, Examples ani ekdum sopa karun sangtaat.
Shilpa Jaywant Ghodke –
DG नी खूपच सुंदर रितीने विषयाची मांडणी व स्पष्टीकरण दिले आहे. कृष्ण व अजु॔न ह्याचा सुसंवाद DG नी उदाहरणांसहीत छान समजावून सांगितला आहे.
Trupti Kulshreshtha –
आधुनिक आणि पारंपरिक विचारांचा सुरेख मेळ घालता येतो हे खूप सोप्या पद्धतीने शिकवले dg नी
Radha Mahabal –
फार छान आणि सोप्प्या पद्धतीने विषय उलगडला..
Rashmi Deopujari –
भगवद्गीता समजून घेण्याची इच्छा पूर्ण झाली
आता apply करण्याची जबाबदारी माझी आहे
Atul A Joshi –
Appreciate for appropriate examples like Krishna
Jyotsana Shende –
It will help me to understand myself better.
Amit Shivaji Sutar –
Very nicely cleared all things, views are different than we think