एक तरी ऋचा अंगीकारावी - ऑडिओव्हिडिओ बुक

HomeDG TalVideo Bookएक तरी ऋचा अंगीकारावी – ऑडिओव्हिडिओ बुक
Author
Dhananjay Gokhale (DG)

प्रत्येकामध्ये क्षमता असतातच! त्यांचा अधिकाधिक वापर करून बाहेर उत्कृष्टता आणि आत शांतता हा अंतर्बाह्य खेळ मस्त खेळता येईल.  यासाठी अत्यंत आवश्यक असलेला स्व-संवाद स्वतःच स्वतःशी संवाद साधण्यासाठी नक्की या मालिकेचा लाभ घ्या!

 

अथर्वशीर्ष म्हणता म्हणता उद्धरेदात्मनात्मानं या न्यायाने – स्वतःच स्वतःची जडणघडण करत करत, स्वतःची प्रगती साधता आली तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. यासाठी माझ्याकडून काही खारीची मदत व्हावी म्हणून हे पुस्तक आपणासमोर ठेवतोय. स्वतःच स्वतःला जाणून घेण्यासाठी या पुस्तकाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. स्वतःची जडणघडण करण्याच्या प्रवासात आपला सह-प्रवासी म्हणून हे पुस्तक नक्कीच मोलाची कामगिरी बजावेल याची मी आपणाला खात्री देतो.

मध्ये एकदा एका व्यक्तीची भेट झाली. परदेशात होतो. व्यक्तिमत्त्वांचे प्रकार यावर चर्चा सुरु होती. तेव्हा तो असेच म्हणून गेला, “DG, I have been staying with a stranger for whole of my life.” म्हणजे “मी एका अनोळखी व्यक्तीबरोबर माझे संपूर्ण आयुष्य जगतोय”. असं ऐकल्यानंतर आजूबाजूच्या माणसांपैकी एकाने विचारलेच, “असे कसे होईल! कोण आहे ती व्यक्ती जी तुझ्याबरोबर आयुष्यभर राहूनही तू तिला ओळखत नाहीस?” त्यावर त्याने सांगितले, “ती व्यक्ती म्हणजे मीच! माझ्याचबरोबर संपूर्ण आयुष्य काढूनही मी मलाच अनोळखी आहे.”
आपल्यापैकी अनेकांची हीच अवस्था आहे. पण या अवस्थेतून बाहेर यायला हवं. आणि त्यासाठी अथर्वशीर्ष मदत करतं. मला माझी स्वतःची ओळख करून घेण्यासाठी हे अथर्वशीर्ष आहे.

Duration
Lifetime
Learnign Hours
7
PDUs
NA
PDU Segments
NA
Sessions
41
Cumulative Participants
Language
Marathi
Platform
Vimeo
Price

1,200.00

Watch Related Videos