एक तरी ऋचा अंगीकारावी

HomeDG BooksAtharvasheershएक तरी ऋचा अंगीकारावी
Author
Dhananjay Gokhale (DG)
एक तरी ऋचा अंगीकारावी
एक तरी ऋचा अंगीकारावी
आवडता गणपतीबाप्पा आपल्यामधेच असल्याची सुंदर जाणीव पुस्तक देतं. मीचमाझा मूर्तिकार आहे हे सत्य आपलेपणाने समजावूनसांगतं.
अथर्वशीर्षमध्ये वर्णन केलेल्या क्षमता स्वतःमध्येच दडल्या आहेत आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर परत मिळवू शकतो. आवडता गणपतीबाप्पा आपल्यामधेच असल्याची सुंदर जाणीव आणि मीच माझा मूर्तिकार आहे हे सत्य आपलेपणाने समजावून सांगतं.

हरवलेली गोष्ट हरवली आहे, हे जर आठवणीत असले तर आपण शोधायला लागतो.

पण माझी एखादी गोष्ट हरवली आहे हेच जर मी विसरलो तर मग मी शोधण्याचा प्रयत्न करीन का? असेच काहीसे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अनेक क्षमतांचे झाले आहे. आपल्याला जाणीवच नाहीये की माझ्या या गोष्टी हरवल्या आहेत आणि म्हणून त्या क्षमतांचा शोध मी घेत नाहीये. पण शोधत गेलो तर नक्की सापडेलच. आपण आणि आपल्या क्षमता यांच्या लपाछपीत हे पुस्तक एक मित्र म्हणून नक्की आपली साथ देईल. आपण विसरलेल्या आपल्या क्षमतांची आठवण गणपती अथर्वशीर्ष करून देते. आयुष्य सोपं आणि सुंदर करण्यासाठी साध्या सोप्या युक्त्या सांगणारं, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, पालक, मित्र, टीममेंबर, नेता, वक्ता, श्रोता, योजक – आपल्यापैकी प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगी असं!

Featured
Yes
ISBN
978-93-5396-839-7
Book Format
Paper Back
Pages / Chapters
296/21
Edition
5th
Published
May 2024
Language
Marathi
Price

400.00

Share this book
Explore additional books of interest