प्रत्येकामध्ये क्षमता असतातच! त्यांचा अधिकाधिक वापर करून बाहेर उत्कृष्टता आणि आत शांतता हा अंतर्बाह्य खेळ मस्त खेळता येईल. यासाठी अत्यंत आवश्यक असलेला स्व-संवाद स्वतःच स्वतःशी संवाद साधण्यासाठी नक्की या मालिकेचा लाभ घ्या!
क्षमता असतातच, आपण त्या वापरत नाही! गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतं, पण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. “मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष”! आपल्यापैकी प्रत्येकासाठी अथर्वशीर्ष अत्यंत` उपयोगी आहे. आनंदाने जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे. हा एक सुंदर स्व-संवाद आहे. हाच स्व-संवाद आपणासमोर या छोट्या संवादातून मी उलगडण्याचा प्रयत्न करतो.
₹1,200.00
₹6,100.00
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
10 reviews for अथर्वशीर्षातून सकारात्मक स्वसंवाद!
अविनाश केशव गोहाड –
कोर्स ज्या पद्धतीने केला आहे त्या बद्दल DG नचे
कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यामागील त्यांची अभ्यास, चिकाटी, कॉर्पोरेट मधील कामांचा अनुभव दिसत आहे.
माझी सूचना:- १)DG नी तरुण आणि वयस्कर यांचे वेगळे ग्रुप करावेत. तरुणांना/कामधंदा असणाऱ्यांना कॉर्पोरेट मध्ये कोर्स घेता तसा घ्यावा पण वयस्कर मंडळी ना जे कामातून निवृत्त झाले आहेत त्यांना वेगळ्या तऱ्हेने शिकवावे.त्यांना ही हा कोर्स चांगला उपयोगी आहे.
२) उदाहरणे देताना संस्कृत श्लोक वापरले तर त्याचा मराठी मध्ये पूर्ण अनुवाद सांगावा.
३) काही वेळेस पूर्ण माहिती न देता मध्ये सोडली जाते आणि स्पून फीडींग नको म्हणून पुढचे तुम्ही शोधा असे सांगितले जाते पण त्यामुळे त्या भागाचे पाहिजे तेवढे आकलन होत नाही.
४) कोर्स मटेरियल आमच्यापाशी कोर्स संपल्यावरही राहणे आवश्यक आहे. संदर्भासाठी ते उपयोगी पडेल. कारण एकदा कोर्स करून झाला आणि संपला असा हा कोर्स नाही पुनः पुन्हा त्याची उजळणी आवश्यक आहे.
Manoj Kolsmakar –
Their is no word for DG as he has in-depth knowledge of the subject which he is teaching whether it is Atharwashisha, project management or anything else. Also due to his vast experience in the topic and the real life examples what he gives during the course is amazing. Participants can correlate it to the live scenarios
Gandharva Padhye –
DG, first of all thank you for facilitating such a good course. Most of the facts which are mentioned in atharvasheersha were known to me. So the thing I observed and tried to learn from your course is how to design a course very systematically.
Dhanashree Rajwade –
अथर्वशीर्ष इतके वर्ष म्हणत आले पण तुमचा मुळे अर्थ समजला आणि आता तो अर्थ रोज च्या आयुष्यात implement कसा करायचा हे पण कळलं, आणि practice केली तर implementation पण जमायला लागेल हळू हळू.. धन्यवाद
कस्तुरी निलेश सहस्रबुद्धे –
DG तुम्ही कमाल आहात…आयुष्यातील छोटे बदल करून किती मोठे चांगले परिणाम होऊ शकतात याची जाणीव करून दिलीत. जे जे उत्तम, सुंदर ते अनुभवलं आणि इतरांना देखील सांगितलं .. याकोर्स बद्दल सांगितलं लोकांना…वेगळी संकल्पना…
Leena Bodhe –
Whole experience reminded me of a famous quote, “Leaders lead when they take position, when they connect with their tribes and when they help the tribe to connect to itself. Huge thank you to team for giving a different perspective on how to analyse or approach things. Though provoking… Request you to do something for new generation. Look forward for kids batches. Do let me know if I can contribute. Thank you for everything
Anjali Bhat –
DG, ह्या कोर्स मुळे माझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन positively बदलला.
Chetan Tukaram Chaudhari –
भारतीय संस्कृती मधल्या पारंपारिक ज्ञानाचा उलगडा करून त्याला आजच्या काळातील relevant उदाहरणां सकट समजावून सांगण्यासाठी अभ्यासासोबत धाडस लागतं आणि DG आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने हे आव्हान नुसतं पेललंच नाही तर त्यात झोकून देऊन ह्या आणि इतर courses ला एक सुंदर अनुभव बनवलंय. यापुढे आपल्या संस्कृतीतल्या इतर गोष्टींचाही आदर करून DG नि सांगितल्याप्रमाणे Application Oriented अभ्यास करत राहीन. स्वतःतलया अनोळखीपणाला स्वतःची एक सुंदर ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार…
Nisha Dinesh Karandikar –
जीवनाकडे बघण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन मिळाला, धन्यवाद डीजी
Pushkar Joshi –
Loved the way the complicated Atharvashersha opened up in a whole different way which gives concrete action points to implement it and live it