हे कशाकरता?
Iभगवद्गीता हे नाट्य आहे, हा दोन मित्रांमधला एक अत्यंत हृद्य संवाद आहे. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवादाची गोडी घेऊया. त्यामधील सौन्दर्याचा आणि माधुर्याचा आनंद घेऊया. नाट्य अनुभवताना अर्जुनाचा चेहरा जेंव्हा माझा दिसेल तेंव्हा भगवद्गीता आपली वाटेल. त्यातला कृष्ण आपल्यातच आहे ही खात्री पटेल! आपल्यामधला अर्जुन सापडला की कृष्णाशी संवाद होईलच, नव्हे होतोच. हे नाट्यवाचन भगवद्गीतेचे दहा प्रवेशांचे नाटक अशी संकल्पना करून केलं आहे.
या नाट्यवाचनाचे काही उपयोग आहेत.
१. श्लोक संवाद स्वरूपात सादर केल्याने त्यातील भावना समजून येतील.
२. भावना उमजल्याने भागवद्गीतेशी भावनिक जवळीक निर्माण होईल.
३. संवाद असल्याने शब्द मोकळॆ उच्चारता येतात आणि त्याचा अर्थ कळण्यास मदत होईल.
४. भागवद्गीतेचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरु होण्यास मदत होईल.
गोष्ट भगवद्गीतेची या कोर्समध्ये, पेपरबुक, व्हिडिओबुक किंवा व्हिडिओ सिरीजमध्ये हा संवाद अधिक समजावून घेता येतोच. या नाट्यवाचनाने त्यातली गोडी वाढेल.
करून पहा, आनंद घ्या.